वेब सिरीज आणि त्यातून दाखवण्यात येणारी अश्लीलता
आजकाल सगळीकडे वेबसिरीज हे थोडं फारच जास्त प्रमाणात चालत आहे. वेब सिरीज च्या रूपाने दाखवण्यात येणारी अश्लिलता ही समाजासाठी अतिशय घातक आहे. आणि त्याचे समाजावर फार मोठे दुष्परिणाम होणार आहेत. सोशल मीडिया वरती आजकाल खूप सारे असले व्हिडिओ दिसताहेत , वेब सिरीज एपिसोड वन एपिसोड अशा नावाने आपल्यास दिसत आहेत.
माहिती नाही अशा वेब सिरीज रूपातून हे वेब सिरीज चे प्रोडूसर, डायरेक्टर समाजाला कसला सल्ला देण्याचा प्रयत्न करताहेत हे त्यांनाच ठाऊक. कुठे तरीही आपण असल्या घाणेरड्या वेबसेरीस थांबवायला पाहिजे यांच्याविरुद्ध ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे जिथे हे असली अश्लील वेबसिरिज दिसतील, त्याच्याविरुद्ध रिपोर्ट करायलाच पाहिजे.
” सगी भाभी से प्यार”
” बाप ने किया बेटी को मजबूर”
” दोस्त की बहन के साथ प्यार”
” दोस्ती की मा के साथ प्यार”
” दोस्त के बिवी से प्यार “
” ट्युशन टीचर से प्यार “
” स्कूल टीचर पर आया दील “
केबल वाले परा आया दिल ‘
” भाभी ने किया देवर को मजबूर”
” बेटी से प्यार”.
भावा बहिणीच्या पवित्र नात्याला, शिक्षक विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला, देवर वहिनींच्या पवित्र नात्याला, मैत्रीच्या पवित्र नात्याला एवढेच नाही तर अजुन असे बरीच नाती आहेत की आपल्यासाठी आपल्या समाजासाठी खूप पवित्र आहेत परंतु या वेब सिरीज च्या माध्यमातून या नात्यांमध्य अशी काही अश्लील दाखवली जात आहे की त्याचे परिणाम हे या समाजासाठी फारच घातक होत आहेत, आणि भविष्यामध्ये तर फारच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे दुष्परिणाम दिसून येतील .
आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज ,जिजाऊ साहेब अहिल्याबाई , सावित्रीबाई यांच्या कथा ऐकून मोठा झालेला हा आपला समाज आहे. जिजामातेने स्त्रियांचा सन्मान करायचे शिकवण आपल्याला दिलेली आहे. अशा या थोर जिजामातेच्या देशातील आपण नागरिक आहोत. आपण लहानपणापासून स्त्रीचा आदर कसा करायचा असे शिक्षण घेऊन मोठे झालेले आहोत. आपल्यावर असणारे संस्कार हे जिजामातेचे आहेत. तर माझी एवढीच विनंती आहे या वेबसीरीज वाल्यांना, अश्लील वेबसीरिज काढण्यापेक्षा, तुम्ही जिजामातेचे संदेश देणारे जिजामाते ची शिकवण देणारी वेब सिरीज काढा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगणारे वेब सिरीज काढा बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित वेबसीरिज काढा, तुमचे वेब सिरीज बनण्याचे स्वप्नही पूर्ण होईल आणि या समाजाला या थोर विचारवंतांचे विचार मिळतील. या थोर विचारवंतांचे विचार घेऊन येणारी पिढी ही सुसंस्कृत बनेल , महिलांचा आदर करेल ,समाजाला एक चांगली दिशा मिळेल, एका चांगल्या समाजाची रचना होईल.
पण अशाच अश्लील वेब सिरीज बनत राहिल्या आणि त्या बिनधास्तपणे फेसबुक, युट्युब आणि अनेक बराच सोशल मीडियावर चालत राहिल्या तर एक दिवस असा येईल, ज्या समाजात स्त्रीला सन्मान मिळणार नाही, एक मित्र आपल्या मित्रावर ती विश्वास ठेवू शकणार नाही, एक भाऊ आपल्या भावा वरती विश्वास ठेवू शकणार नाही, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते असे काही बदलून जातील ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. त्यामुळे आताच आपण कुठेतरी जागं झालं पाहिजे आणि असल्या असलील वेब सीरीज बनवणार यांना धडाशिकवलाच पाहिजे, अशा असलील वेब सीरीज बंद झाल्याच पाहिजे. त्यासाठी कुणी तरी सरकार काही करेल याची अपेक्षा न बाळगता आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे जिथे ही अशा कुठे वेब सीरीज असतील त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट करा युट्युब वर असतील तर तिथेच रिपोर्ट म्हणून ऑप्शन असतो त्या जागी तुम्ही रिपोर्ट करा की ही समाजासाठी घातक आहे फेसबुक वर जर असतील तर फेसबुक वरती ही रिपोर्ट करा की ही समाजासाठी घातक आहे.
आज-काल आपण तर पाहतच आहोत की सोशल मीडिया तर हे असे माध्यम आहे जिथे पाच-सहा वर्षापासून चे मुलं ते 80 वर्षाची म्हातारी ही तुम्हाला मिळतील. लहान मुलांना अशा सोशल मीडिया पासून दूर ठेवणं फारच कठीण आहे. सोशल मीडिया चे खूप सारे फायदे आहेत परंतु काही लोक आपल्या निधी स्वार्थासाठी त्याचा दुरुपयोग करत आहेत आणि त्यामुळे वाईट परिणाम होत आहेत आणि भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या सोशल मीडिया वरती होणाऱ्या अश्लील वेबसिरीज मुळे खूप वाईट परिणाम होतील.
माझा विरोध वेबसिरीज नाही, परंतु वेब सिरीज च्या माध्यमातून जी अश्लील त पसरत आहे तिला कुठेतरी बंधन असावीत. वेब सिरीज अशा काही काढाव्यात जेणेकरून येणाऱ्या पिढीने त्यातून काही तरी संस्कार घ्यावे, कारण आज कालची लहान मुलं ही आई-वडील आजी-आजोबा यांच्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर घालवत आहेत, मग अशाच सोशल मीडियावर दाखवण्यात येणाऱ्या अश्लील वेबसीरिज मुळे आपल्या येणाऱ्या पिढीवर ती नकोति संस्कार मिळतील.
आजकाल तर विभक्त कुटुंब पद्धती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आई वडील दोघेही कामाला जातात, लहान मुलगा किंवा मुलगी हे जास्तीत जास्त वेळ एकटेच असतात, मग आई-वडील ही त्यांना काहीतरी करमणूक व्हावी म्हणून खूप महागडे मोबाईल घेऊन देतात, आणि या मोबाईल द्वारे मुलं सोशल मीडियाच्या संपर्कात येतात.
वेब सिरीज द्वारे दाखवण्यात येणाऱ्या अश्लील ते बाबत आपलं काय मत आहे ही , ही अश्लीलता कशी थांबवता येईल, याविषयी आपलं मत काय आहे, खाली कमेंट करा.
हा लेख तुमच्या फॅमिली ग्रुप मध्ये नक्की पाठवा, जेवढे ही तुमच्याकडे फॅमिली ग्रुप असतील, त्या सर्व ग्रुप मध्ये हा मेसेज गेलाच पाहिजे.
Some web series are as follows,
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|